Mumbai Grahak Panchayat

ग्राहक पंचायत पेठ

वैशिष्ट्ये

1. प्रत्येक ग्राहकाला विक्रेत्याने योग्य पावती देण्याचे बंधन आहे. ग्राहक पंचायत पेठेत ग्राहकाला मिळणाऱया पावतीवर एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही अशी ग्राहकाला जाचक ठरणारी एकतर्फी अट छापण्यास पूर्णत बंदी आहे.
ग्राहकाला विकलेली वस्तू सदोष आढळल्यास किंवा ती त्याला पसंत नसल्यास ग्राहकाने पावती दाखवून वस्तू बदलून मागितल्यास किंवा पैसे मागितल्यास ते देण्याचे बंधन विक्रेत्यावर आहे. बाजारपेठेतील ही उचित प्रथा (Fair Practice USP) इतर कोणत्याही पेठेत आढळत नाही.

2. सामाजिक बांधिलकीचे भान संस्था विसरत नाही. मतिमंद, अपंग, कृष्ठरोगी अशांसाठी काम करणाऱया विविध सामाजिक संस्थांना विनामूल्य गाळा पंचायत पेठेत दिला जातो.

3. ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागृत, सक्षम करण्याचे कार्य संस्था या पेठांच्या माध्यमातून ‘जागो ग्राहक जागो’ द्वारा केले जाते. अन्नधान्यातील भेसळ ओळखणे, योग्य वजनमाप, नकली उत्पादनांपासून सावधानता यांसारख्या अनेक विषयांवर ग्राहक जागृती केली जाते.

4. किंमतीची घासाघीस करण्यास पूर्णपणे मज्जाव पंचायत पेठेत आहे. (No Bargaining)

5. एकावर एक फ्री, फुकट, सेल अशा भूलवणाऱया संकल्पना येथे नाहीत.

6. पर्यावरणाचे भान, पूर्णत प्लास्टिक बंदी.

7. स्वदेशी, उत्तम दर्जेदार उत्पादनाची विक्री.
पंचायत पेठेत खरेदी केलेल्या एखाद्या वस्तूविषयी तक्रार उद्भवल्यास तक्रार निवारण्याची यंत्रणा आहे.

8. गाळेधारक सुरक्षितता- पंचायत पेठ कालावधीत गाळेधारकाचा पेठेत असलेल्या मालाचा विमा काढला जातो. प्रत्येक गाळेधारकाला त्या त्या ठिकाणी विम्याचे संरक्षण आहे.

9. ज्या ज्या उत्पादनांना मानांकन असणे सक्तीचे आहे. अशीच उत्पादने त्याची खात्री करूनच पेठेत ग्राहकांना उपलब्ध होतात. उदा. FSSAI, BIS, ISI etc.

Grahak Peth Video Gallery

Panchayat Peth Committee

अध्यक्ष

अनुराधा देशपांडे

सदस्य

ज्योत्स्ना कानेगांवकर
अनघा आचरेकर
अलका मोकाशी
उल्का पाटील
उमा अभ्यंकर

प्रिती कोळमकर
अंजली बापट
सुचिता पाटणकर
राजेंद्र राणे